नाणे मावळात संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद  - गावोगावी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून बैठका सुरू

 - 'मशालचिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

 कामशेत (प्रबोधन न्यूज ) - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ नाणे मावळात गावोगावी संवाद बैठका सुरू आहेत. निष्ठावंत शिवसैनिकासह महाविकास आघाडीचे पदाधिकारीकार्यकर्ते 'मशालचिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहेत.

 मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारीसर्व सहकारी मंडळी यांनी उत्साहात प्रचार सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसारतील कोंडीवडेउकसानगोवित्रीवळवतीकांब्रेतसेच तळेगाव दाभाडेजवळी माळवाडी या भागात गावात सदिच्छा भेट देत संजोग वाघेरे पाटील यांच्या सहका-यांनी गावक-यांशी संवाद साधला.

 मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी अशा प्रकारे वाघेरे पाटील यांचा प्रचार सुरू आहे. विविध गावांमध्ये दिवसभर व रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या जात आहेत. संजोग वाघेरे पाटील यांचे परिचय पत्रक व त्यांच्या संदेशाचे पत्र ग्रामस्थमहिला व युवा वर्गापर्यंत जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील हे नाव आणि मशाल चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहे. मावळ लोकसभेचे पुढचे खासदार संजोग वाघेरे पाटीलच असतीलअसा विश्वास सर्वांकडून मिळत आहे.