स्वप्नांना पंख 'नारायणा' इन्स्टिट्यूटचे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वप्नांना पंख 'नारायणा' इन्स्टिट्यूटचे

नारायणा स्कॉलिस्टीक ॲप्टिट्यूड टेस्ट (एनसॅट - २३) परिक्षेव्दारे विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती - राठोड शंकर सिंह

पिंपरी,(प्रबोधन न्यूज )  -  देशातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने 'एनसॅट -२३' या ॲप्टिट्यूड टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी, जेईई, नीट, मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संचालक राठोड शंकर सिंह यांनी केले.
नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने 'एनसॅट २३' परीक्षेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राठोड बोलत होते. यावेळी व्यवस्थापक संजय कुमार तर शैक्षणिक विभाग प्रमुख परिणीता सुधांशू, प्रा. भगवान पटेल आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले की, नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट १९७९ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. भारतातील २३ शहरांमध्ये संस्थेच्या ६५० पेक्षा अधिक शाखा आहेत. समाजातील विविध घटकांमधील विद्यार्थ्यांना 'एनसॅट - २०२३' परीक्षेत सहभागी होता यावे हा उद्देश समोर ठेवून नारायणा इन्स्टिट्यूट कार्य करत आहे. ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेतली जाईल. एनसॅट परीक्षेद्वारे नारायणा इन्स्टिट्यूट इयत्ता सातवी ते अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा शोध आणि शिष्यवृत्ती चाचणी आहे. जी देशातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा (आयआयटी, जेईई, नीट) साठी नारायणा इन्स्टिट्यूट सर्वोच्च संस्था आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी शंभर रुपये भरून अर्ज करू शकतात. https://nsat.narayanagroup.com या संकेतस्थळावर जाऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन, राठोड यांनी केले. पिंपरी चिंचवड आणि अन्य भागांतून एनसॅट परीक्षा ऑफ लाईन पद्धतीने ऑक्टोबर महिन्यात एक, पंधरा आणि एकोणतीस या तारखेला होईल; तर ऑनलाईन परीक्षा आठ, नऊ, दहा, अकरा, बारा ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी शाम गोरे - ९५२२२००७९७ किंवा संजय कुमार - ९५२२२००७५० या भ्रमणध्वनी वर संपर्क करावा असे आवाहन राठोड यांनी केले.
संजय कुमार म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांची गरज ओळखून नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळते. एनसॅट २३ परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फी सवलती द्वारे एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. नारायणा इन्स्टिट्यूटने तीन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात शाखा सुरू केली. या शाखेतून आतापर्यंत १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. अल्पावधीतच संस्थेने उच्च, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. जवळपास ६५० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची निवड आयआयटी, मेडिकल, अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली असल्याचे संजय कुमार यांनी सांगितले.
यावेळी शैक्षणिक विभाग प्रमुख परिणीता सुधांशू, प्रा. भगवान पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.