पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरु- महापौर उषा ढोरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरु- महापौर उषा ढोरे
पिंपरी -
पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढल्यानंतर रुग्णालय प्रशासन सर्तक झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमायक्रोनच्या उपाययोजना सुरूच होत्या. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरू आहे. सद्यस्थितीला ओमिक्रॉनचे लागण झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील नव्याने बांधण्यात आलेलया वीर जिजामाता रुग्णालायात या रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. 

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने आपण निर्बंध हटवले होते. कोरोनाच्या नियमनामध्येही शिथिलता आणली होते . मात्र , नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा नियम कडक करण्यात येत आहेत. ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियमांचं तंतोतंत पालन करायला हवे. शहरवासीय प्रशासनाला यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही ढोरे यांनी यावेळी केले.

शहरात आढळलेल्या सहा ओमिक्रॉन रुग्णांची स्थिर आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेत जी उपचार पद्धती होती, तीच उपचार पद्धती या रुग्णांवर अवलंबली गेली आहे. यामधील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या लहान मुलांना देखील कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज पडलेली नाही.अशी माहिती महापालिकेच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांनी लसीचे डोस घेतलयाचा सकारात्मक परिणाम ही दिसून आलेत. लस घेतलेली असल्यामुळं पॉझिटिव्ह रुग्णांकडून फारसा प्रसार झालेला नाही. अशी माहिती जिजामाता रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.