हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रेझेंटेशन सादर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रेझेंटेशन सादर

पिंपरी-चिंचवड, दि. 31 मे - दि. ३० मे रोजी सकाळी ११ वाजता हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन, मिडाज् टॉवर शेजारी फेज-१ हिंजवडी येथे पोलीस आयुक्त्त पिंपरी चिंचवड अंकुश शिंदे यांचे अध्यक्षतेखाली हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन मेंबर, पी.एम.आर.डी.ए. अधिकारी, पी.डब्लू.डी.अधिकारी, एम.आय.डी.सी. अधिकारी यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या समस्येशी संबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्री.कर्नल(निवृत्त) भोगल साहेव यांनी आयटी सेक्टर मधील विवध प्रश्नांशी संबंधीत विषयसंबंधाने प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीची समस्या व त्यावरील उपाययोजना यावावत श्री.विठ्ठल कवडे, पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग, यांनी प्रेझेंटशन सादर केले. या प्रसंगी आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये एच.आय.ए., पी.एम.आर.डी.ए, पी.सी.एम.सी., एम.आय.डी.सी व पोलीस खाते असे सर्वांनी सहकार्याने व समन्वयाने काम करून हिंजवडी आयटी पार्क व इंडस्ट्रीजचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.

सदर वैठकीस आनंद भोईटे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पिंपरी चिंचवड, श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त्त वाकड विभाग, डॉ.विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन, सुनिल पिंजण, पोलीस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग, विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष कर्नल (निवृत्त) भोगल व विविध आय.टी कंपन्यांचे प्रतिनिधी पी.एम.आर.डी.ए. चे अधिकारी, एम.आय.डी.सी. चे अधिकारी, उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये श्री. अधिराज गाडगीळ (हरविंजर कंपनी) यांनी आभार प्रदर्शन केले.