शिरोळे चाळ, शिवाजीनगर येथील एस.आर.ए लाभार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर एस.आर. ए अधिकाऱ्यांची असंवेदनशील वागणूक- आमदार सिद्धार्थ शिरोळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिरोळे चाळ, शिवाजीनगर येथील एस.आर.ए लाभार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर  एस.आर. ए अधिकाऱ्यांची असंवेदनशील वागणूक- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  गणेश खिंड रोड, शिरोळे चाळ, शिवाजीनगर येथील एस.आर.ए लाभार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून "ना घरके; ना घाटके" अशी स्थिती येथील नागरिकांची झाली आहे. सात वर्षांपासून ना ही घर मिळाले, नाही तात्पुरती व्यवस्था सोयीची करण्यात आली. विकसक नारणवरे यांच्याकडून सन २०१७ पासून ते जून २०२३ पर्यंत अनेक तोंडी- लेखी मुदत दिली असून आजतागायत लाभार्थ्यांना घर मिळाले नाही. सध्या ते औंध  ट्रांझिट ठिकाणी राहत असून तेथे देखील योग्य सोय नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

या नागरिकांच्या आग्रहास्तव आज रविवार दिनांक ३० जुलै रोजी शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी पाहणी केली असता एस.आर.ए विभागाचा हलगरजी पणा लक्षात येताच तत्काळ संबंधित अधिकारी दिनेश गटणे यांना फोन द्वारे सूचना केल्या. बिल्डिंग परिसरामध्ये पाणी साटल्याने दुर्गंध आणि आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहे. सोबतच टाकी साफ नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी कसरत महिला भगिनींना करावी लागत आहे. कचरा, स्वच्छता, लिफ्ट, आवागमन साधनांची कमतरता आदी अनेक समस्यांना सामोरे जाऊन हलाखीचे जीवन आम्हाला जगावे लागत आहे अश्या भावना येथील नागरिकांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या समोर व्यक्त केल्या यावेळी भाजप शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, दत्ताभाऊ खाडे देखील उपस्थित होते. 

आमच्या समस्यांचे निवारण करा, जो जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत प्रत्येक कुटुंबाला 5000 महिना प्रवास भत्ता द्या अशी मागणी, तर लवकरात लवकर घरचा ताबा द्या नाहीतर चालू काम बंद पाडून एस.आर.ए कार्यालयासमोर संसार मांडू असा इशारा त्रस्त नागरिक बंडू बजारे, अक्षय पायगुडे, समीर ढोक, निखिल निंबाळकर, सागर भुजबळ, गणेश माने, चंदा पायगुडे, शिल्पा मारणे, सुनीता पढेर, अनंता कुंजीर, महेश माने, यांच्यासह सर्व रहिवासी महिला भगिनीनी दिला.