पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जुलै २०२३ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जुलै २०२३ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांचा सत्कार

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    आज सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना उत्तम कामगिरी करून महापालिकेचा पाया मजबूत केला त्यामुळे  महापालिकेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असल्याचे मत ई क्षेत्रिय अधिकारी राजेश आगळे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते माहे जुलै २०२३ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.    
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधी चारूलता जोशी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जुलै २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये  मुख्याध्यापिका उषा काळोखे, कल्पना राऊत, अलका ताठे, सिस्टर इनचार्ज स्नेहल पाटील, सहाय्यक कार्य व्यवस्थापक तानाजी थिगळे, मुख्य लिपीक सुदाम केंगले, पुरूषोत्तम ढोरे, सिद्धाप्पा पाटील, उपशिक्षिका रंजना चव्हाण, रखवालदार रामभाऊ थोपटे, मुकादम उद्धव चौरे, सफाई कामगार अंजना धोत्रे, सुलिंदर पवार यांचा समावेश आहे.               
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.