पुणे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; सहकार नगर तोडफोड प्रकरणी 7 जणांचं तडकाफडकी निलंबन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; सहकार नगर तोडफोड प्रकरणी 7 जणांचं तडकाफडकी निलंबन

  पुणे , (प्रबोधन न्यूज )   -  पुण्यातील  वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस  आयुक्त रितेश कुमार  आता अॅक्शन मोडमध्ये आहेत. पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलं आहे. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलिसांनी अगोदर या प्रकरणात गुन्हा दाखल न करता अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली होती.  त्यानंतरही ही घटना घडली. पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती, तर तोडफोड टळली असती, असा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी निलंबनाती कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकार नगर परिसरात दोन गटांत हाणामारी झाली होती. यावेळी परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. याचाच ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. सहकार नगर परिसरातील घटना घडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. परंतु, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. 

'या' पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे,समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारूती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि  विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.