भिमाशंकरजवळ २७ महिला प्रवाशांनी भरलेली बस पेटली; बस जळून खाक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - नाशिक येथील बस दुर्घटना ताजी असताना पुण्यात सुद्धा अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल २7 महिला प्रवाशी हे सुदैवाने बचावले आहेत. भीमाशंकरला जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्सबसने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीतून बुधवारी सकाळी एक खासगी बस भीमाशंकरकडे जात होती. भिवंडी पाये गावातील 27 महिला या बसमधून प्रवास करत होत्या. मंगळवारी रात्री अकराला ही बस भिवंडीहून निघाली होती.
बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही बस घोडेगावच्या पुढे गाडी आली असता शेजारून जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरने गाडीतून धूर निघत असल्याचे बस चालकाला सांगितले. यानंतर चालकाने बस बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे त्याला दिसले. यानंतर सर्व महिला प्रवासी तातडीने बसमधून उतरल्या. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि हा हा म्हणता म्हणता संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. आगीत बससह आतील प्रवासी महिलांचे सर्व सामान जळून खाक झाले.
दरम्यान, दुसरी बस मिळेपर्यंत या महिला प्रवाशांची व्यवस्था शारदा प्रबोधिनी येथे पांडुरंग महाराज यवले यांनी केली. आगीमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.