एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा; चर्चा अंतिम टप्प्यात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा; चर्चा अंतिम टप्प्यात

मुंबई - 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या सात दिवसांपासून राज्यभरातील ‘लालपरी’ची चाके थांबली आहेत. मात्र या संपावर तोडगा निघण्याची शक्यता बळावली असून राज्य शासन आणि कर्मचारी संघटनांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.

‘सहृय़ाद्री’ अतिथीगृहावरील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परिवहनमंत्री परब म्हणाले, विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात नेमलेल्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल सकारात्मक आला तर तो मंजूर केला जाईल परंतु जरी अहवाल नकारात्मक आला तरी सरकार कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल. कामगारांचे निलंबनही मागे घेतले जाईल परंतु कामगारांनी कामावर परतावे असे आवाहन अनिल परब यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. शिष्टमंडळ एसटी कर्मचाऱ्यांशी प्रस्तावावर चर्चा करून संप मागे घेण्यावर विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नेमलेल्या कमिटीच्या अहवालासाठीचा कालावधी 12 आठवडय़ांहून कमी करून घेण्यात येणार आहे. विलिनीकरणाबाबतच्या कमिटीच्या शिफारशी सकारात्मक असल्यास त्या शिफारशी मंजूर करण्यास सरकार बांधील असेल. कमिटीचा विलीनीकरणाबाबत निर्णय नकारात्मक आल्यास कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल’, असेही अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. साधारण सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे, की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळाले पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, किती त्यावरती आपण बोझा घेऊ शकतो? इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एपंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असे मी सांगितले असल्याचे परब यावेळी म्हणाले.

याचबरोबर, ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत शासानाने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता कामगारांशी चर्चेसाठी ते (कामगारांचे शिष्टमंडळ) गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. संपकरी कामगारांनी संप लवकरात लवकर संप थांबवून कामावर येण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असताना आडमुठे धोरण स्वीकारून पृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी प्रचंड तोटय़ात  आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे.’ असे आवाहन देखील परिवहनमंत्र्यांनी केले.

86,586 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

एसटी महामंडळाच्या हजेरी पटावर प्रशासकीय विभागाचे 9,426 कर्मचारी असून त्यापैकी 2,265 कर्मचारी हजर झाले असून 6,849 कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. कार्यशाळेचे हजेरी पटावर 17,560 कर्मचारी असून 758 कर्मचारी हजर राहिले असून 15,956 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर हजेरीपटावर 37,225 चालक असून आतापर्यंत केवळ 111 चालक हजर झाले असून संपात 36,758 चालकांनी सहभाग घेतला आहे. तर हजेरीपटावर 28,055 वाहक असून केवळ 32 वाहक हजर झाले असून 27,023 वाहकांनी संपात सहभाग घेतला आहे. हजेरी पटावर एपूण 92,266 कर्मचारी असून 3,166 कर्मचारी हजर झाले असून 86,586 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

3,166 कर्मचारी हजर, 71 बसेस रवाना 

एसटी महामंडळाने काल 36 बसेस विविध मार्गांवर सोडल्यानंतर आज शनिवारी सायं. 6 वाजेपर्यंत 71 बसेस विविध मार्गांवर रवाना केल्या. यात खाजगी शिवशाही, शिवशाही, शिवनेरी आणि साध्या बसेसचा समावेश आहे. या बसेस बोरीवली, दादर, नाशिक, मिरज, स्वारगेट, पुणे, ठाणे, संभाजीनगर, ठाणे, धुळे, जळगाव, राजापूर, सांगली, पनवेल येथून सोडण्यात आल्या असून 1,938 प्रवाशांनी यातून प्रवास केला.