अकरा वर्षात २९ बछड्यांना जन्म देणाऱ्या ‘सुपर मॉम’चं निधन; वन्यप्रेमीही हळहळले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
‘कॉलरवाली वाघिण’, ‘पेंचची राणी’ ‘सुपर मॉम’ अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीने २००८ ते २०१९ या ११ वर्षांमध्ये २९ बच्छड्यांना जन्म दिला होता. यापैकी २५ बछडे जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वार्धक्यामुळे अशक्त झालेली ही वाघीण शुक्रवारी, १४ जानेवारीला जंगलात पर्यटकांना शेवटची दिसली. तज्ज्ञांच्या मते, वाघाचे सरासरी वय सुमारे १२ वर्षे असते.
मार्च २००८ मध्ये या मादीला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यानंतर रेडिओ कॉलरने काम करणे बंद केले होते. जानेवारी २०१० मध्ये तिला पुन्हा रेडिओ कॉलर लावले होते. सप्टेंबर २००५ मध्ये प्रसिद्ध वाघीण टी-७ ने चार बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक म्हणजे ही ‘कॉलरवाली’ वाघीण होय. नंतर ही वाघीण ‘कॉलरवाली’ किंवा 'टी-१५' या नावाने प्रसिद्ध झाली.