पिंपरी-चिंचवड शहर भाजपला आणखी एक धक्का; माया बारणे यांचा राजीनामा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 4 मार्च - पिंपरी-चिंचवड भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षातील गटतट, भ्रष्टाचार आणि आमदारांच्या मनमानीला कंटाळून नगरसेविका माया बारणे यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. सुरुवातीला नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा देत आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला, तर पाठोपाठ दुसरे नगरसेवक तुषार कामठे यांनी आणि नगरसेविका चंदा लोखंडे यांनी राजीनामा देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांना झटका दिल्याने भाजपा गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षातील आणखी २२ नाराज नगरसेवक भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता माया बारणे यांनीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पक्ष सोडल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपात राजीनामा सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांनी दोन्ही आमदारांवर खापर फोडले आहे. आमदारांच्या मनमानी, हुकूमशाहीवर हे नगरसेवक नाराज आहेत. भाजपाला लागलेली गळती रोखण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना यश मिळताना दिसत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीही न जुमानणाऱ्या नाराज गटामुळे भाजपच्या दोन्ही आमदारांची गोची होताना दिसत आहे.
शहर भाजपासाठी माया बारणे यांचा राजीनामा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे पती माजी नगरसवेक संतोष बारणे यांनीही भाजपा सोडले आहे. माया बारणे या थेरगावमधून दुसऱ्यांदा नगरसेविका होऊनही त्यांना पाच वर्षांत एकही महत्वाचे पद मिळाले नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांचे आश्वासन दिले पण जाणीवपूर्वक त्यांना डावलले गेले. माया बारणे यांनी भाजपाच्या नेत्यांवर खापर फोडले आहे. महापालिकेतील आमदारांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल घरचाच आहेर देत माया बारणे, तुषार कामठे यांनी ताशेरे ओढल्याने राजकारण तापले आहे. तिसरीकडे भोसरीतून बिनविरोध भाजपा नगरसेवक झालेले रवी लांडगे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या गैरकारभार आणि हुकूमशाही कारभाराबद्दल माध्यमांतून आरोप केल्याने भाजपा त्रस्त आहे.