शरद पवारांसोबत 45 मिनिट झाली चर्चा, बैठकीनंतर पटेल म्हणाले.....

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवारांसोबत 45 मिनिट झाली चर्चा, बैठकीनंतर पटेल म्हणाले.....

 मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -  अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्याचे पहिलेच विधानसभा अधिवेशन सुरू झालं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदारांनी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर बैठकीत काय झालं? याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. तब्बल 32 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवार यांची मनधरणी केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आम्ही आज इथं आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल ज्याप्रमाणे विनंती केली. तशीच विनंती आज केली. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवार यांनी भूमिका घ्यावी. काल ज्याप्रमाणे त्यांनी आमचं ऐकून घेतलं. त्याप्रमाणे आजही शरद पवार यांनी ऐकून घेतलं असल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार यांना या भेटीची कल्पना नव्हती. शरद पवार आल्यानंतर 45 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासमोर दोनतीन आमदारांनी निवदने दिली. शरद पवार यांनी सर्व ऐकून घेतलं. "इतके दिवस आपण भाजपविरोधात बोललो, काम केल, आता मला रस्ता दिसत नाही", असं मत शरद पवार यांनी मांडलं.