मुंबई, पुणे, पालघरला कुठला अलर्ट दिलाय? मुंबईत आतापर्यंत किती पाऊस झालाय?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - कोकण आणि मुंबई पट्ट्यात पावसाने जोर पकडलाय. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. अजूनपर्यंत तरी, सर्व काही सुरळीत सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक कोलमडल्यास मुंबईच्या वेगाला ब्रेक लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने बुधवारसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या काही भागात आज पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे
पुढच्या 3 ते 4 तासात सिंधूदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुण्यासाठी कुठला अलर्ट?
हवामान विभागाने रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. इथे काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. ठाणे, रत्नागिरी आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
कुठे जाहीर झाली सुट्टी?
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद राहणार असल्याच त्यांनी म्हटलय.
किमी मिमी पाऊस झाल्यानंतर अलर्ट दिला जातो?
दिवसभरात 115.6 mm ते 204.4 mm पाऊस झाल्यानंतर ऑरेंज अलर्ट दिला जातो. दिवसभरात 204.5 mm च्या पुढे पाऊस झाल्यास रेड अलर्ट दिला जातो.
मुंबईत 24 तासात किती पाऊस झालाय?
औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागच्या 24 तासात मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 47.42mm , 50.04 mm आणि 50.99mm पाऊस झाला.