मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकमध्ये चोरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकमध्ये चोरी

 पिंपरी  , (प्रबोधन न्यूज )  -    मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या बाजूला ट्रक पार्क करून झोपलेल्या चालकाचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) पहाटे दोन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

विशाल भरत वाघमारे (वय 26, रा. वाकड. मूळ रा. बीड) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक (एमएच 14/एचजी 9666) चालक आहेत. ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात असताना उर्से टोलनाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला ट्रक पार्क करून ट्रक मध्ये झोपले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या केबिनचा डाव्या बाजूचा काच उचकटून केबिनमध्ये प्रवेश केला. फिर्यादी यांचा आठ हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 18 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.