दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्याकरीता रुग्णवाहिका आणि टँकर पुण्यातून रवाना  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्याकरीता रुग्णवाहिका आणि टँकर पुण्यातून रवाना  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष

 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष

तीन पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि टँकरची विनामूल्य सोय

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता तीन सुसज्ज रुग्णवाहिका आणि दोन टँकर पुण्यातून रवाना झाले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करुन या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांसह ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ पायमोडे, ज्ञानेश्वर रासने, विजय चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
 
ै रुग्णवाहिकेसोबत डॉ.सुरेश जैन, डॉ.दिलीप सातव, डॉ.राहुल दवंडे, डॉ.शुभम मिश्रा, डॉ.जानवी मोकाशी, डॉ.तनिष्का पाटील, डॉ.ॠषिकेश अलाटकर, डॉ.शौनक पिंपळकर यांसह स्वयंसेवकांची टिम असणार आहे. उपक्रमाचे यंदा ३४ वे वर्ष आहे.
 
डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, सासवड मार्गे जाणा-या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणा-या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यासोबत आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला जातो. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येतात. तसेच औषधोपचार विनामूल्य दिला जातो. हजारो वारकरी दरवर्षी या आरोग्य सेवेचा लाभ घेतात.