उधारी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण

उधारी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   किराणा दुकानाची उधारी मागितली म्हणून दोघांनी तरुणाला स्टील पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी मारुंजी, मुळशी येथे घडली.

प्रवीण घीसाराम चौधरी (वय 20, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल सुभाष मोहोड (वय 28, रा. मुळशी), नलेश सुभाष मोहोड (वय 25, रा. मारुंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. आरोपींनी तेथून उधारीवर किराणा घेतला. त्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला आरोपींनी हाताने, लाकडी दांडक्याने व स्टीलच्या पाईपने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.