'तुमच्या गुगलीने आपलाच गडी...', पहाटेच्या शपथविधीवरून भुजबळांचा पवारांवर थेट निशाणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'तुमच्या गुगलीने आपलाच गडी...', पहाटेच्या शपथविधीवरून भुजबळांचा पवारांवर थेट निशाणा

      मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -   राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर आता शक्तीप्रदर्शन सुरू झालं आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. तसंच अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरून भुजबळ यांनी थेट पवारांवरच निशाणा साधला आहे.

'2014 साली भाजपने शिवसेनेची साथ सोडली, मग आपणही काँग्रेससोबतची आघाडी तोडली. काँग्रेसची साथ का सोडली? आपण मेजॉरिटीमध्ये आलो असतो, पण साथ का सोडली माहिती नाही. पहाटेचा शपथविधी का झाला? गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? आम्हालाही माहिती नाही. का ते दादा सांगतील त्यांची इच्छा असेल तर,' असं छगन भुजबळ म्हणाले.

2017 सालीही प्रयत्न झाले तेव्हा मी जेलमध्ये होतो, मला माहिती नाही. अजितदादा सकाळीच उठले आणि का गेले तिकडे? जनतेला सांगितलं पाहिजे,' अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली आहे.