'समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी'- नवाब मालिकांचा आरोप ; केपी गोसावीचे व्हॉट्सऍप चॅट केले जाहीर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवाब मलिक यांनी मंगळवारी सकाळीच ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांची सरबत्ती केली. काशिफ खान आणि वानखेडे यांचे काय संबंध आहेत? त्याची माहिती एनसीबीने द्यावी. काशीफवर देशभरात गुन्हे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला का वाचवलं जात आहे हे सांगावं. एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे. तरीही त्याला का वाचवलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.
काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता. गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे. रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात. पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही. कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही. तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही? व्हाईट दुबईला का अटक झाली नाही? असे प्रश्न मलिक यांनी विचारले.