ही दोस्ती तुटायची नाय, ज्याने उदयनराजेंना दाखवलं आस्मान, तो नेता आजही पवारांसोबत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ही दोस्ती तुटायची नाय, ज्याने उदयनराजेंना दाखवलं आस्मान, तो नेता आजही पवारांसोबत

      मुंबई  , (प्रबोधन न्यूज )   -      आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका मुंबईत होणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर बहुमताचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी समोर आली आहे. या यादीनुसार 53 आमदारांपैकी 25 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर शरद पवार यांना 13 आमदारांचा पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे. तर 15 आमदार हे  अजूनही तटस्थ भूमिकेत असल्याचं पहायला मिळत आहेत. दरम्यान, या संघर्षात शरद पवार यांचा एक मित्रही आजही त्यांच्यासोबत सह्याद्रीसारखा उभा असल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारेही फुटल्याने पवारांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अशाही परिस्थिती पवारांच्या एका मित्राने मात्र साथ सोडली नाही. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे जुने मित्र आजही त्यांच्यासोबत आहेत. या मित्रासाठी शरद पवार यांनी साताऱ्यात भरपावसात सभा घेतली होती. त्याच दोस्ताने आज पुन्हा एकदा मैत्री निभावली आहे.