युतीच्या काळात एकनाथ शिंदेंचा फडणवीसांवर प्रचंड राग होता – विनायक राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

युतीच्या काळात एकनाथ शिंदेंचा फडणवीसांवर प्रचंड राग होता – विनायक राऊत

मुंबई, (प्रबोधन वृत्तसेवा) - युती सरकारच्या काळात तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ शिंदेंचा प्रचंड राग होता. ते तेव्हा भाजपच्या त्रासाला कंटाळले होते. तेव्हा  शिंदेंनीच भाजप विरुद्ध प्रथम आवाज उठवला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याची तक्रारही केली होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची समजूत काढली होती. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले आहेत, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत नुकताच एक गौप्यस्फोट केला होता. २०१४ मध्ये शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांनी सांगितले. सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.

चव्हाण पुढे म्हणाले की, त्यावेळी आपण या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सुचवले होते. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटल्याचेही चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेतूनही प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी चव्हाण यांच्या गौप्यस्फोटात तथ्य असल्याचे सांगितले आहे. अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर माजी खासदार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी आणखी एक गौप्यस्फोट करत दावा केला की, एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आता शिंदे सांगतात आम्हाला राष्ट्रवादी नको, काँग्रेस नको. खरं तर ते त्यावेळीसच काँग्रेसमध्ये गेले असते. त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे हे जनता बघत आहे.

त्यामुळे आता या आरोपांवर एकनाथ शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.