राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एसटीची नवी नियमावली जाणून घ्या ! आंतरजिल्हा प्रवास करतानाच्या 'या' अटीही ठेवा लक्षात !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एसटीची नवी नियमावली जाणून घ्या ! आंतरजिल्हा प्रवास करतानाच्या 'या' अटीही ठेवा लक्षात !

मुंबई, (प्रबोधन न्यूज) -  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलीय.

* ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एसटी नियमावली :
- एसटी बस मधून फक्त आपत्कालीन कर्मचारी प्रवास करणार
- एसटी महामंडळाच्या 16 हजार गाड्यांपैकी स्थानिक पातळीवरील डेपो मॅनेजर निर्णय घेऊन 50% गाड्या रस्त्यावर उतरणार
- डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी  यांनाच त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट देण्यात येईल.
- कोणतीही व्यक्ती  ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती प्रवास करता येईल

* आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासासाठी खासगी बसगाड्यांसाठी नियम :
1.  बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.
2.  सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.
3. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल  

* खासगी प्रवासी वाहतूक :
अ) बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
ब) खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.