शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते, आम्ही काहीही करू शकतो - चंद्रकांत खैरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते, आम्ही काहीही करू शकतो - चंद्रकांत खैरे

बीड, दि. 9 मे – शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते हा आरोप शिवसेनेच्या विरोधकांनी केला नाही तर चक्क शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खरं तरं ही काही अभिमानाची बाब असूच शकत नाही, परंतु राणा दाम्पत्यांना इशारा देताना त्यांची जीभ घसरली व ते बोलून गेले. 

चंद्रकांत खैरे हे बीड दौऱ्यावर होते, त्या वेळी ते बोलत होते. "नवनीत राणांबद्दल मी काहीही बोलणार नाही, कारण मी काही बोललो तर मग ते परत व्हायरल होईल. मला त्या बाईचा राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती बाई काहीही बोलते आहे. ती बाई कशी होती हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते. आम्ही जाऊन काहीही करु शकतो", असं खैरे म्हणाले.

उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख आहेत, आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल काहीपण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल? ती बाय काय होती, कसंकाय माहिती आहे ना सगळं. जातीचं खोटं प्रमाणपत्र आणून निवडणूक लढवली. आता भाजपचा पाठिंबा आहे म्हणून. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आली तर ती तिकडे गेली. पक्ष बदलणारी ती बाई आहे", असा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केला.

आम्ही जनतेची सेवा करतोय. महाराष्ट्र एक नंबरला आणण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांचं आहे. ते आम्ही नक्की आणू, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तसेच पक्षातील नेत्यांचे दौरे आता सुरु होतील. कोरोनामुळे दौरे बंद होते. कोरोनामुळे सभा बंद होत्या. पण आता सगळीकडे जोरात सभा आहेत", असंही त्यांनी यावेळी सांगितलं.