नगरमधून उद्या धावणार पहिली शिवाई ई-बस
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अहमदनगर, दि. 31 मे – राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच धर्तीवर १ जूनला अहमदनगरच्या तारकपूर स्थानकातून सकाळी साडेनऊ वाजता शिवाई ई-बस नगर-पुणे मार्गावर धावणार आहे. यावेळी रांगोळी, बसची सजावट आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक विजय गिते यांनी दिली.
शिवाई ई-बस प्रथमच नगर-पुणे रस्त्यावर धावणार असल्याने प्रवाशांनाही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नगर-पुणे ही पहिली बस १९४८ रोजी धावली. त्याच वाहनाचे पहिले वाहक लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्याच हस्ते पहिल्या शिवाई ई-बसचे उद्घाटन होणार आहे. तर पुणे-नगर येथील शिवाई ई-बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
शिवाई ई-बस नगरमधून पहिल्या दिवशी बुधवारी साडेनऊ वाजता व नंतर दररोज सात वाजता नगर येथून ही बस पुण्याच्या दिशेने जाणार आहे. एसटी महामंडळाने एक मोठे पाऊल उचलले असून टप्प्याटप्प्याने शिवाई बस वाढवण्याचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे इंधन बचतीबरोबरच प्रदूषणही कमी होणार आहे. राज्यभरात टप्प्याटप्प्याने या बस सुटणार आहेत. ही बस तीन तासांत १२५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार आहे. एका चार्जिंगमध्ये सुमारे ३०० किलोमीटर प्रवास करण्याची बसची क्षमता आहे. अहमदनगर व पुणे येथे चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर-पुणे बसचे तिकीट २६० रुपये असणार आहे. नगर-पुणे बसच्या रोजच्या चार फेऱ्या नगरकडून, तर पुणे-नगर येथून चार फेऱ्या होणार आहेत.