मोशीतील स्टेडियम प्रकल्प त्वरित रद्द करा - ऍड. सचिन भोसले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने 400 कोटी खर्च करुन मोशी येथे आंरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट घातला आहे. शहरालगत गहुंजे येथे सुसज्ज स्टेडियम असताना नव्याने स्टेडियम बांधण्याचा निर्णय संशयास्पद व पैशाची उधळपट्टी करणारा वाटतो. त्यामुळे हा निर्णय आणि याकामी सल्लागाराची केलेली नेमणूक त्वरीत रद्द करावी. अन्यथा महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असल्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांनी दिला.
यासंदर्भात भोसले यांनी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका मोशी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी 400 कोटींचा खर्च करीत आहे. स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची किंवा नेत्यांची अशा कुठल्याही प्रकारची मागणी नसताना तसेच गरज नसताना, अशा प्रकारे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी करणे योग्य नाही.
पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे. नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट संशयास्पद व पैशाची उधळपट्टी करणारा आहे. शहरामध्ये क्रीडागंणे कमी व विकसित नसल्याकारणाने शहरातील मुले रस्त्यावर व खासगी अपुऱ्या मैदानांवर खेळतात. 400 कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशा स्वरूपाचे 100 क्रीडागंणे आपण बांधू शकता, जेणेकरून नागरिकांच्या मुलांना त्याचा फायदा होईल, ती मुले सक्षम, शारीरिक दृष्ट्या सदृढ बनतील व दर्जाचे खेळाडू घडतील, असेही भोसले यांनी म्हटले आहे.
------
आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे
नागरिकांच्या मुलभूत सुविधांना आधी प्राधान्य देण्यात यावे. अशी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागणी आहे. आयुक्त अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचा पैसा वायफळ खर्च करणार असतील, तर ते कदापी सहन करणार नाही. क्रीडागंण नेमके कुणासाठी व कशासाठी बांधताय यामागे कोणाचे राजकारण आहे, याचे आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे. कुठलीही गरज नसताना अशा पद्धतीने नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्याच्या दृष्टीकोनातून क्रिकेट स्टेडियमची निर्मिती करण्याला शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध आहे. आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच सल्लागाराची नेमणूक रद्द करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठे जनआंदोलन उभे करेल, असा इशारा भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.