पोलीस आयुक्तांनी नागरिकांसाठी स्वतःचा व्हॉट्स अप फोन नंबर जाहीर केला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोलीस आयुक्तांनी नागरिकांसाठी स्वतःचा व्हॉट्स अप फोन नंबर जाहीर केला

पिंपरी-चिंचवड, दि. 9 मे - शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे. कामकाजात अनेक बदल करीत, पोलीस स्थानकांना सकाळीच अचानक भेटी देणे सुरू केले आहे. सर्वात प्रथम त्यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व बदल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हाट्सअपवर करावी, असे आवाहन अंकुश शिंदे यांनी केले आहे. पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे.

हा क्रमांक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आला आहे. पोलीस स्टेशन येथे जर आपली तक्रार घेतली नाही, तर सदरची तक्रार 9307945182 या नंबरवर व्हाट्सअपद्वारे करावी, असे पोलीस ठाण्यांत लावलेल्या फलकांवर नमूद केले आहे.

स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, तर नागरिकांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व्हाट्सअपद्वारे तक्रार करता येणार आहे. या तक्रारींची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. तक्रारीची शहनिशा करून स्थानिक पोलिसांना विचारणा होणार आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कार्यालयाकडून होणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारींचे निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.

आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. यापुढे पोलीस ठाणे अथवा विविध शाखांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्यास संबंधित प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी दिली. आयुक्तांच्या या आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली.