पीएमआरडीए आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामंजस्य करार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पुणे विभाग आणि बुसान मेट्रोपॉलिटन शहरामधील नागरी विकासात सहकार्य आणि सहकार्य सुलभ करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) दक्षिण कोरियातील बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बुसान येथील के-आर्ट इन्स्टिट्यूटच्या संचालक हो सूक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुण्याचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याशी सामंजस्य करार केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त सुनील पांढरे उपजिल्हाधिकारी तथा आयुक्तांचे ओएसडी रामदास जगताप, उपायुक्त शिल्पा करमरकर यांच्यासह डॉ. राजेंद्र जगदाळे महासंचालक आणि सीईओ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भागीदार संस्थांमधील परस्पर सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण सुलभ करणे हा सामंजस्य कराराचा उद्देश आहे. बुसान आणि पीएमआरडीए द्विपक्षीय शहरी विकास क्षेत्रात आयोजित केलेल्या धोरणांची आणि प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण करुन या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कला (ललित कला आणि परफॉर्मिंग आर्ट), संस्कृती, चित्रपट, संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रात मनुष्यबळाची देवाणघेवाण केली जाणार आहे. हा सामंजस्य करारामुळे पीएमआरडीए क्षेत्रात किंवा बुसानमध्ये द्विपक्षीय कार्यक्रम, बैठक, सेमिनार, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात मदत होईल. त्याचबरोबर द्विपक्षीय अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतील.
शाश्वत विकास आणि बांधकामासाठी विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण सुलभ करण्यास देखील मदत होणार आहे. या सामंजस्य कराराच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी, पीएमआरडीएच्या वतीने सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे, ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रवर्तित केलेली संस्था, समन्वयक एजन्सी म्हणून काम करेल.