गॅस टॅंकर दुर्घटना बचाव कार्यातील वीरांचा सन्मान, आयुक्तांच्या हस्ते गौरव
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )- मुंबई पुणे महामार्गावरील निगडी उड्डाणपुलावर पहाटे गॅस वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टॅंकर पलटी झाल्याने त्यावर 18 तासाच्या अथक प्रयत्नपूर्वक कामगारिने नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने त्या साहसी वीरांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत असताना टॅंकर चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटला आणि दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे उड्डाणपुलाच्या सुरूवातीला हा टॅंकर अपघातग्रस्त झाला. टॅंकर पलटी झाल्यानंतर गॅसची गळती चालू होती. टॅंकरमधील गॅस लिकेज बंद करून गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. त्यामध्ये पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, बीपीएल कंपनीचे अधिकारी, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले, आणि मोठा अपघात होण्यापासून टळला. त्यामुळे महापालिकेचे अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या महत्वपुर्ण प्रयत्नांबद्दल त्यांचा आयुक्तांनी सत्कार केला.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमी वाहन चालकास खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने देहूरोडहून पुण्याकडे जाणारी आणि निगडीहून देहूरोडकडे जाणारी वाहतूक वळवली. तसेच, विद्युत वितरण कंपनीस तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सुचना दिल्या. तसेच अपघातग्रस्त परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव केला, या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
भारत पेट्रोलियम कंपनी लिमीटेडचे आरोग्य सुरक्षा व्यवस्थापक किरण सिनकर यांनी शिक्रापूर येथून त्वरित येऊन अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस त्वरित दुसऱ्या रिकाम्या टॅंकरमध्ये भरला. याकामी त्यांनी कंपनीची आपातकालीन व्यवस्था यंत्रणा वापरून परिस्थिती आटोक्यात आणली, याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अपघातग्रस्त मदत संस्थेचे धनंजय गीद तसेच हनीप गर्देकर यांनी खोपोली येथून येऊन अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस गळती थांबविली. अशा प्रकारच्या गंभीर घटनांचा प्रदीर्घ अनुभव असलेले धनंजय यांनी जोखीम पत्करून परिस्थिती नियंत्रणात आणली, त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
--------
नागरिकांचे आभार
आकाश क्रेन सर्विसच आकाश शीरसाठ यांनी धोकादायक परिस्थितीत गॅस गळती होत असलेला अपघातग्रस्त टॅंकर क्रेनच्या सहाय्याने सरळ केला, त्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. निगडीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर तसेच व्यापारी संघटनेचे सुरेश चौधरी, पप्पू दासानी, अफसर मुलाणी, भरत गारगोटे, जगदीश चौधरी, विकास सुभेदार, राजू काळभोर, अनिकेत काळभोर, सचिन शिंदे, रफिक शेख या सर्वांनी घटनास्थळी मदत करून दुकाने बंद करणे, नागरिकांना प्रतिबंध करणे यासाठी मदत केली, तसेच परिसरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आयुक्त शेखर सिंह यांनी आभार मानले.