चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?

चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा

करंदी , (प्रबोधन न्यूज) - दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष फुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरल. चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? असे थेट सवाल करत डॉ. कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला.

खासदार डॉ. कोल्हे आज आंबेगाव शिरुर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, शंकर जांभुळकर, बाळासाहेब नरके, पांडुरंग थोरात, सनी थिटे, दामुशेठ घोडे, पुजा वळसे पाटील, अशोक भुजबळ, सुजित शेलार, स्मिता ढोकले करंदी बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा, नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले अस म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. तर बारामतीकर उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले, आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री ही येतील. पण माझ्या सर्वसामान मतदाराला कळतय. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याचा पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही. तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.