कुदळवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे फराळ वाटप
चिखली , (प्रबोधन न्यूज ) - आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व वै ह भ प वामनमहाराज यादव ,कै नथु खंडु यादव,कै सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था याच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव लांडगे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले,
यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दिनेश लालचंद यादव सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग अध्यक्ष आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच,यांच्या वतीने करण्यात आले होते