ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नियम पाळा ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नियम पाळा ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन
मुंबई - 

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनने आता संपूर्ण देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. शेजारील राज्य कर्नाटक आणि गुजरातसह मुंबईतही रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांनी कोरोना नियम पाळण्यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. देशात सध्या ओमिक्रॉनचे एकूण 5 रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण शनिवारी महाराष्ट्रात सापडला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्या नियमांंचं काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनने काही दिवसातच जगातील अर्ध्याहून अधिक देशात प्रवेश केला आहे. त्याचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला आहे. ओमिक्रोनला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या महामारीत अनुशासन आणि कोरोनासंदर्भात घातलेले नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

डेल्टाला रिप्लेस करण्याचे काम ओमीक्रोन ने केले आहे, ओमिक्रोनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. डेल्टा व्हेरिएंटवर आपण मात केली, डेल्टाचे राज्यात रुग्ण कमी झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परंतु ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो आणि ओमिक्रोनला रोखण्यासाठी साठी जे जे करता येईल ते करावे लागणार, तसेच मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांंच्यात अजूनतरी ओमिक्रोनसंदर्भात बैठक झाली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन लागला आणि कित्येक दिवस घरात बसून काढावे लागले, तशी वेळ पुन्हा येऊ द्यायची नसेल तर नियमांंचं पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.