पीएमआरडीएकडून लाभार्थ्यांना घरांचे वाटप
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 येथे उभारलेल्या गृहप्रकल्पातील 2 हजार 821 घरांचा ताबा लाभार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (दि. 23) देण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधान असून त्यांची घराची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत सदनिका हस्तांतरण कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमआरडीएच्या वतीने पेठ क्रमांक 12 येथे पहिल्या टप्प्यात 4 हजार 883 घरे बांधली आहेत. त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांना घरे देण्यात येत आहेत. आतापर्यंत 3 हजार 226 लाभार्थ्यांनी घरांचा ताबा घेण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी हप्त्याची सर्व रक्कम पीएमआरडीए कार्यालयाकडे जमा केली. तसेच, आवश्यक डेटा एंट्री प्रक्रिया व अन्य कार्यवाही पूर्ण केली. तर, आतापर्यंत 1 हजार 74 नागरिकांचे दस्त सह-दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अंतिम करण्यात आले. त्यातील शुक्रवारपर्यंत एकूण 2 हजार 821 नागरिकांना घरांचा ताबा देण्यात आला.
पीएमआरडीएच्या वतीने 6 जूनपासून ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटातील सदनिकांसाठी ताबा देण्याची प्रक्रिया हाती घेतली होती. 6 ते 19 जूनपर्यंत वेळापत्रकानुसार ही कार्यवाही झाली. वेळापत्रकानुसार जे नागरिक घरांचा ताबा घेण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्यासाठी 22 तारखेपासून घरांचा ताबा देण्याची कार्यवाही केली जात आहे. 26 तारखेपर्यंत ही कार्यवाही चालणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 ही वेळ त्यासाठी निश्चित केली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची 1 जुलैपासून नोंदणी
पेठ क्रमांक 12 मधील गृह प्रकल्पातील काही घरांसाठी डिसेंबर 2022 मध्ये दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली. त्या सोडतीतील ज्या लाभार्थ्यांनी हप्त्याची सर्व रक्कम भरली आहे, त्यांची नोंदणीप्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या विस्तृत सूचना पीएमआरडीएच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.