महिलेला मारहाण, लघवी पाजण्याचा प्रयत्न, चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महिलेला मारहाण, लघवी पाजण्याचा प्रयत्न, चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा

पुणे, दि. 23 मे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ केली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर तिला लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने महिलेचा विनयभंग करत चप्पलने मारहाण केली. ही घटना पुण्यातील सुसगाव परिसरात घडली असून महिलेने आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 4 महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्यानंतर संबंधित महिला सासऱ्या सोबत जाब विचारण्यासाठी गेली होती. आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब तिने विचारला. त्यावेळी आरोपींनी महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्या, चपला आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर आरोपींनी बाटलीत लघवी गोळा करुन आपल्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला आणि सासऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार 15 मे रोजी सूसगाव या ठिकाणी घडला होता. घडलेल्या प्रकारामुळे महिला आणि तिचे सासरे तणावात होते. या धक्क्यातून सावरत महिलेने 21 मे रोजी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसाठी आठ जणांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे करीत आहेत.