डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन जल्लोषात   साजरा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

  

पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज )  -  येथील डॉ. डी. वाय.पाटील पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २१ जून २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस व जागतिक संगीत दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  विद्यार्थी व शिक्षक अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय लवचिकतेने आणि सहजपणे योगाचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांची दाद मिळवली. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका दिपा मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगावर आधारित गीत सादर केले तसेच विविध वाद्य वाजवून सर्वांची वाहवा मिळवली. शारिरीक स्वास्थ्यासाठी योग व मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत आपल्यासाठी कसे महत्वाचे आहेत व त्यामुळे आपण कसे निरोगी, आनंदी व दीर्घायु आयुष्य जगू शकतो याचे महत्व विद्यार्थ्यांनी सांगितले. 
प्राचार्या.  ज्योती झोपे व शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन  योगासनांचा आनंद घेतला. शाळेच्या प्राचार्या  ज्योती झोपे यांनी योग दिन व संगीत दिनाचे महत्व सांगून सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभाग समन्वयिका बीना सहानी व माध्यमिक विभाग समन्वयिका  सुनंदा चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा विभागाच्या पार्वती बाकळे, किर्ती शिंदे, रीमा प्रजापती व संगीत शिक्षिका दिपा मालवणकर यांनी विशेष मेहनत घेतली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौर्य बुट्टे व सृष्टी गरदास तर आभार प्रकटन दर्श नानावटी या विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका अनीता पीटर व मिशेल लोबो यांनी मार्गदर्शन केले.
 संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ.सौ. भाग्यश्री पाटील, 
सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.