रेजिना हेरी फ्रॅन्सिस यांची राष्ट्रवादी शहर ख्रिश्चन कमिटी सेलच्या अध्यक्षपदी निवड

रेजिना हेरी फ्रॅन्सिस यांची राष्ट्रवादी शहर ख्रिश्चन कमिटी सेलच्या अध्यक्षपदी निवड
रेजिना हेरी फ्रॅन्सिस यांची राष्ट्रवादी शहर ख्रिश्चन कमिटी सेलच्या अध्यक्षपदी निवड

पिंपरी (प्रबोधन न्यूज) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहर ख्रिश्चन कमिटी सेलच्या अध्यक्षपदी रेजिनी हेरी फ्रॅन्सिस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे आणि महिलाध्यक्षा कविता आल्हाट यांच्या हस्ते रेजिना यांना देण्यात आले. कविता संदेश आल्हाट, महिलाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या सहीने त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

रेजिना हेरी फ्रॅन्सिस या अनेक वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठेने काम करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात हिररीने भाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे. रेजिना हेरी फ्रॅन्सिस यांनी सन 2016 मध्ये शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपणास असलेल्या राजकीय व समाज कार्याची आवड, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवारसाहेबांविषयी असलेली निष्ठा आणि म्हणूनच आपण आजवर उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदाद पवार, प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंत पाटीलसाहेब, मा. ना. खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्षा मा. विद्याताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणात आला आहात.

आपली पक्षनिष्ठा व सेवाभावी वृत्तीची दखल घेऊनच समाजकारणाला राजकीय पदाचे बळ मिळावे म्हणून आपली पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष महिला ख्रिश्चन कम्युनिटी सेल या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.