शहरात ‘फ्रेंडशीप डे’ उत्साहात , मित्रांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा; ऑनलाइन संदेशांचीही धूम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शहरात ‘फ्रेंडशीप डे’ उत्साहात ,   मित्रांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा; ऑनलाइन संदेशांचीही धूम

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -  शहराच्या विविध भागांत रविवारी उत्साहात फ्रेंडशीप डे साजरा करण्यात आला. रविवारी सुटी असल्याने कॉलेज बंद होते तरी देखील मित्रांनी एकमेकांना शुभेच्छा देत फ्रेंडशीप डे साजरा केला. व्हॉट्स अॅपवरुनही एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मैत्रीचे किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा यानिमित्ताने देण्यात आला.

नेहमीच्या रविवारपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आजच्या ‘फ्रेंडशिप डे’च्या रविवारी तरुणाईत विशेष उत्साह पाहायला मिळाला. एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार युवक-युवतींनी केला. चिमुकल्यांमध्येही या दिवसाबाबत उत्साह पाहायला मिळाला. त्यातच दिवसभर पावसानेही उसंत दिल्याने युवकांच्या उत्साहात भर पडली. बाजारात उपलब्ध बहुरंगी बॅण्ड मित्र-मैत्रिणींच्या मनगटावर बांधून अनेकांनी आपल्या मैत्रीची गाठ आणखीच घट्ट केली.
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. आज सुटीचा दिवस असून महाविद्यालयाच्या आवारात येथे मैत्रीदिनानिमित्त तरुणाईची उपस्थिती दिसत होती. फ्रेंडशिप डेविषयी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरही विशेष उत्साह पाहायला मिळाला.  शनिवारी  रात्री बारापासूनच फेसबुक व अन्य सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. देश-विदेशात राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी या दिवसाच्या शुभेच्छा देत मैत्रीभाव व्यक्‍त केला.
व्हॉटसअप, फेसबुक, ट्‌विटरवर शुभेच्छा
मैत्री व्यक्‍त करण्याच्या दिवशी आपला जवळचा मित्र- मैत्रीण भेटू शकत नसल्याने मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘एसएमएस‘चा आधार अनेकांनी घेतला. अनेकांनी फेसबुकवरून मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देणे पसंत केले. त्यामुळे व्हॉटसअप, फेसबुक, ट्‌विटरवर तर मैत्रीच्या शुभेच्छांचा वर्षाव ओसंडून वाहत होता. कविता, शेर, शुभेच्छापत्रे याद्वारे अनेक जण मैत्रीविषयी भावना व्यक्त करीत होते. लहान मुलांनी देखील आपल्या वर्गातील मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधले. सोशल मिडियावर देखील 'फ्रेंडशिप डे'ची क्रेझ दिसून आली. शनिवारी रात्रीपासूनच फेसबूक, टेलिग्राम, व्हॉट्सअॅपवर 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा देणारे संदेश फिरू लागले होते.