अखेर पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा संपली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे. पुण्यातील काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही परिसरात मुसळधार तर पावसाच्या हलक्या सरी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. सोबतच पुणे शहराजवळील ग्रामीण भागातदेखील शेतकरी पावसाकडे डोळा लावून बसले होते. अखेर या उकाड्यातून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
वारजे, शिवणे परिसरात मुसळधार तर कात्रज, कोंढवा, कोथरुड, स्वारगेट, नांदेड सिटी , सातारा रोड, धायरी, सिंंहगड रोड परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (24 जून) मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, उद्या (25 जून) आणि परवा (26 जून) दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे.
पुण्यात ऊन पावसाचा खेळ...
पुण्यात काही परिसरात मुसळधार तर काही परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील काही परिसरात हलक्या सरीचा पाऊस सुरु असून बाणेर, पाषाण परिसरात ऊन आहे. मात्र उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.