एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगारांकडून चोऱ्यांची वाढ, परप्रांतीय कामगारांची वेळोवेळी आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी - अभय भोर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगारांकडून चोऱ्यांची वाढ, परप्रांतीय कामगारांची वेळोवेळी आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी - अभय भोर

         पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   - एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगारांकडून चोऱ्यांची वाढ  तसेच परिसरात भंगारचे दुकान त्यामुळे  चोऱ्यांमध्ये वाढ कंपन्यांमधील तसेच हॉटेल व्यवसायिकांकडे असलेल्या परप्रांतीय कामगारांची वेळोवेळी आयुक्तालयाकडून तपासणी व्हावी अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज भोसरी एमआयडीसी येथे आयोजित बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1, पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर,सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन राजेंद्र निकाळजे यांच्याकडे चोऱ्या थांबविण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी करण्यात आली.

भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये अनेक कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर पर राज्यातील कामगार कामाला येतात तसेच या ठिकाणी असलेले हॉटेल टपरी या ठिकाणी देखील अनेक परप्रांतीय कामाला आहेत परंतु हे परप्रांतीय रात्रीच्या वेळेस एमआयडीसी मध्ये चोऱ्या करण्यास सुद्धा पुढाकार घेत असल्याचे दिसून येते यामध्ये कमी वयाचे देखील अनेक तरुण समाविष्ट असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा कागदपत्रे आढळून येत नाहीत चोऱ्या करून ही मंडळी गावाला निघून जातात आणि चोऱ्यांचा प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत असून या ठिकाणी असलेली छोटी मोठी भंगारची दुकानं देखील याला कारणीभूत आहेत चोरी केल्यानंतर जवळच भंगारचा दुकान असल्यामुळे या ठिकाणी भंगार व्यवसायिकांना या चोरांमार्फत हा मालपुरवठा केला जातो एमआयडीसी परिसरामध्ये पोलीस आयुक्तालयातर्फे वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेतल्यास एमआयडीसीतील चोऱ्यां थांबविल्या जाऊ शकतात तरी पोलीस आयुक्तालयाकडून त्वरित एमआयडीसीतील कामगारांची तपासणी मोहीम हातात घेऊन प्रत्येक हॉटेल व्यवसायिक व्यापारी आणि कंपनीने आपल्याकडे कामाला ठेवणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्र जवळ ठेवणे गरजेचे आणि सक्तीचे करावे असे मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय दादा भोर यांनी आज केली यावेळी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांनी उद्योजकांच्या समस्यांकडे गांभीर्याने समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.