एमटीडीसी रिसॉर्टमध्ये वर्षातील 22 दिवस महिलांना 50% सवलत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केले महिलाकेंद्रित पर्यटन धोरण
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - राज्याचे महिला धोरण लटकले असले तरी महिलांसाठीचे पर्यटन धोरण मंगळवारी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केले. हे “आई’ महिलाकेंद्रित पर्यटक धोरण आहे, ज्यात उद्याेजक महिलांना कर्जावरील व्याजात सवलत व पर्यटक महिलांसाठी एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये वर्षातील २२ दिवस ५० टक्के शुल्क सवलतीचा समावेश आहे. पर्यटन विभागाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलाकेंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरणाची पंचसूत्री जाहीर केली. यात महिला उद्योजकता विकास, महिलांसाठी पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज्ड उत्पादने, प्रवास व पर्यटन विकास ही पंचसूत्री आहे.
अपंग, वृद्ध महिलांना लिफ्टजवळ खोल्या : एमटीडीसीच्या मालमत्तांमध्ये, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी जागा दिली जाईल. रिसॉर्टमध्ये विशेष सुविधा, अपंग किंवा वृद्ध महिलांकरिता लिफ्टजवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील.
छत्रपती संभाजीनगरचे पर्यटक निवास असेल पूर्णत: महिला संचालित व्याज सवलत याेजनांचा लाभ घेणारा पर्यटन व्यवसायिक हा पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्या चालवत असाव्यात. त्यात ५० टक्के महिला कर्मचारी असाव्यात. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत, एमटीडीसीचे छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास असणार आहे.
महिलांना मिळतील अशा सवलती पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या होम स्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी यासारख्या उद्योगांसाठी बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम १२% च्या मर्यादेत, त्यांच्या बँक खात्यात, पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाच्या रकमेच्या साडेचार लाखांच्या मर्यादेपर्यंत दरमहा अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल, हा महत्त्वपूर्ण निर्णयही धोरणात आहे.
ऑनलाइन बुकिंग सक्तीची : एमटीडीसीच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना २०% सूट देण्यात येईल. या २०% सवलतीची रक्कम महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाईल. महिला पर्यटकांना, महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस, युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च या कालावधीत तसेच वर्षभरात इतर २२ दिवस अशी एकूण ३० दिवस फक्त ऑनलाइन बुकिंगमध्ये ५० टक्के सूट असेल.