प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र.८९मध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॅाकलेट देऊन स्वागत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा कुदळवाडी क्र.८९ येथे नवीन मुलांचे स्वागत प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत गुरूवार दि.१५ जून २०२३ रोजी मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले.
त्याप्रसंगी कुदळवाडी प्रभागाचे स्वी.नगरसदस्य दिनेश यादव उपस्थित होते. त्यांचे हस्ते सर्व प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॅाकलेट देऊन स्वागत करण्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.त्या प्रसंगी त्यांनी शाळेतील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना निरोप देऊन इथूनपुढे नवीन शाळेमध्येही उत्कृष्ट काम करून या शाळेप्रमाणे त्याही शाळेचा नावलौकीक वाढवावा व नवीन शिक्षकांनीही शाळेचा स्तर उंचावत न्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच या वर्षी ८ वीच्या वर्गास मान्यता मिळालेनंतर यापुढे दहावीपर्यंत मुलांना कोठेही जायची आवश्यकता राहणार नाही.शाळा दोन शिफ्टमध्दे करून ९ वी,१० वीचेही वर्ग सुरू करणार आहोत असे श्री.दिनेशशेठ यादव यांनी सांगितले.शिक्षण विभागाने शाळेतील १२ शिक्षकांपैकी ६ शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळेत विस्कळीतपणा येऊ शकतो परंतु ९१२ पटाच्या शाळेसाठी आणखी ८ शिक्षकांची आवश्यकता आहे असे प्र.मुख्याध्यापक .संपत पोटघन यांनी सांगितले .कार्यक्रमाचे नियोजन मारूती खामकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी केले.श्री.विठ्ठल बगाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शैलजा गायकर यांनी सर्वांचे आभार मानले.