सीए व्हायचंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सीए व्हायचंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे

बदलेल्या सीएच्या नवीन अभ्यासक्रमाची लवकरच अंमलबजावणी - सीए शर्मा

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अभ्याक्रम मंडळाने सीएचा अभ्यासक्रमाचा साचा तयार केला असून, लवकरच नवीन  अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती आयसीएआयच्या अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष सीए दयानिवास शर्मा यांनी दिली.

आयसीएआय पश्चिम विभागीय मंडळ अंतर्गत पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने चार्टर्ड अकौंटंटच्या (सीए) बदलत्या अभ्यासक्रमाविषयी चर्चा सत्राचे निगडी येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

यावेळी सीएच्या अभ्यासक मंडळाचे उपाध्यक्ष सीए विशाल दोषी,  मध्यवर्ती मंडळाचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, मध्यवर्ती मंडळाचे माजी सदस्य सीए डॉ. शिवाजी झावरे, अभ्यासक मंडळ सदस्य सीए डॉ. एम. एम. जाधव, सीए अशोककुमार पगारीया, सीए पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए विजयकुमार बामणे, सचिव सीए पंकज पाटणी, उपाध्यक्ष सीए सचिन बंसल, विकासाचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, खजिनदार सीए सारिका चोरडिया, सीए सचिन ढेरंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा भिसे यांनी तर आभार सचिन बंसल यांनी मानले.

आय सी ए आय दिल्ली या संस्थेमार्फत या अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन केले जाते. जागतिक व देश पातळीवरील होणाऱ्या आर्थिक बदलांची दखल घेऊन दर ५ वर्षांनी सीए कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये योग्य तो बदल करून सीए व्यवसायाची उच्चता व गुणवत्ता ठेवण्यासाठी हा बदल देश व जग पातळीवर महत्वाचा ठरतो. २०२२ साली अभ्यासक्रमामध्ये सुचविलेल्या बदलांची माहिती व त्यावर विद्यार्थी पालक कंपन्या इ. भागीदारीकांच्या टिप्पणी व सूचना घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सुचविलेले बदल –

१) दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेऊन १२ वी नंतर विद्यार्थ्यांना फौंडेशन या प्रथम परीक्षेला बसता येईल. परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक विषयात ५०% मार्क्स मिळविणे अपेक्षित आहे. चार विषय असून २ विषयांची परीक्षा नेहमीप्रमाणे होईल.

२) सी ए फौंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्षांमध्ये इंटर्मीडिएट परीक्षेला दोन ग्रुप्स मधील एकूण ६ विषयांची परीक्षा द्यावयाची आहे. सध्या एकूण विषयांची संख्या ८ आहे. या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात कमीत कमी ४० व एकुणात ५०% मार्क्स मिळविणे जरुरीचे आहे.

३) इंटर्मीडिएट परीक्षेमधील दोन्ही ग्रुप्स मधील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट्स कडे २ वर्षाची आर्टिकलशिप (प्रत्यक्ष अनुभव ) करणे अनिवार्य आहे. हा कालावधी आधी ३ वर्षांचा होता व इंटर्मीडिएट परीक्षेला १ ग्रुप पास झाल्यावरही प्रवेश घेता येत होता. परंतु चांगल्या पद्धतीने २ सलग वर्षे प्रात्यक्षिक अनुभव मिळावा हा त्यामागील उद्देश आहे. २ वर्ष्याच्या कालावधी मधील दुसरे १ वर्ष हा अनुभव मोठ्या कंपनी मधील नोकरी करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्सकडेही विद्यार्थ्यांना करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

४) आर्टिकलशिप संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना फायनल परीक्षेसाठी २ ग्रुप्स मधील एकूण ६ विषयांची परीक्षा द्यावयाची आहे. या परीक्षेसाठीही प्रत्येक विषयात कमीत कमी ४० व एकुणात ५०% मार्क्स मिळविणे अपेक्षित आहे. सध्या या परीक्षेमध्ये ८ विषय आहेत.

५) आर्टिकल्सच्या कालावधीमध्ये तसेच फायनल परीक्षेपूर्वी विद्यार्थांना आपल्या आवडीच्या ४ विषयांची निवड करून संगणकाद्वारे या विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतु या विषयाचे मार्क्स सी ए कोर्सच्या फायनल परीक्षे मध्ये धरले जाणार नाहीत याचीही नोंद घ्यावी.

६) सी ए फायनल परीक्षा पास झाल्यानंतर जर चार्टर्ड अकाउंटंट ला व्यवसाय सुरु करावयाचा असेल तर सीए फर्म मध्ये एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जरुरीचे राहील. सध्या सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व्यवसाय ताबडतोब सुरु करता येतो. परंतु या बदलानंतर व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यासाठी निश्चितच महत्वाचा घटक राहील.

७) परदेशातील  विद्यार्थ्यांलाही हा कोर्से उपलब्ध आहे. व देशामधील विद्यार्थ्यांना परदेशी आर्टिकल्स करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

वरील ठळक अशा बदल्यानंतर हुशार, मेहनती व सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्से आयुष्यामधील बदलाची नांदी  ठरेल व १२ वी नंतर पुढील साडे तीन वर्षांमध्ये एक उत्तम व्यावसायिक होण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमासाठी अंदाजे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.