स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीयाने देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले पाहिजे- इम्रान शेख
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर काळेवाडी येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी शंभराहून अधिक रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी युवक तर्फे रक्तदात्यांना एक प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देखील प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक शहर सचिव पियुष अंकुश आणि युवक पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार नेते काशिनाथ नखाते व युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले "भारताला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 77 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.आज भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.
परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,धार्मिक दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया,मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. बेरोजगारी ने थैमान घातले आहे.यावर एकच उपाय म्हणजे देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.आपण भारतीय नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून,आपापसातील सर्व वैर सोडून प्रत्येक भारतीयाने देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल."
यावेळी राष्ट्रवादी युवक चे ओम शिरसागर, विकास कांबळे,मेघराज लोखंडे, आदम शेख,सलीम भाई डांगे, उमेश कदम.दीपक अंकुश, संतोष मोरे, चैतन्य जगताप, बालाजी गायकवाड,सोहेल शेख, अर्सल शेख,व्यंकटेश मदारे,ओम लोंढे,सोहन राठोड, विजय पवार,जनाबाई जाधव भारती अंकुश,अलका कांबळे,उषा अंकुश,स्वप्नाली असोले आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी हजर होते.