वैष्णवांचे महावितरणकडून स्वागत; अल्पोपाहाराची सेवा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वैष्णवांचे महावितरणकडून स्वागत; अल्पोपाहाराची सेवा

पुणे, (प्रबोधन न्यूज) -  जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडींचे सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता नाशिकफाटा येथे आगमन झाले. यावेळी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार तसेच वरिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी वैष्णवांचे स्वागत केले.

महावितरणच्या वतीने नाशिक फाटा येथे पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या स्वागतासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. संजीव राठोड, कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रेय साळी व श्री. उदय भोसले यांच्यासह अभियंता व जनमित्रांनी वैष्णवांचे स्वागत केले. यावेळी महावितरणकडून चिवडा व बुंदीचे २० हजार पाकिटे वितरीत करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. यानंतर मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिडींत वारकरी म्हणून नाशिक फाटा ते दापोडीपर्यंत सहभाग घेतला.

दरम्यान जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पुणे परिमंडल अंतर्गत पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे १५० अभियंता व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासह वीज सुरक्षेसाठी उपाययोजना करीत दिडींतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपाहार आदींची महावितरणकडून सेवा देण्यात येत आहे.