वसंत मोरेंकडून पुन्हा एकदा कौतुकास्पद मदत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे आपल्या कामामुळे आणि त्यांच्या भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. नेहमी नागरिकांच्या कामाला धावून जाणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. अनेकवेळा त्यांनी मदतीसाठी आक्रमक भूमिकासुद्धा घेतली आहे. परंतु बुधवारी रात्रीची घटना वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केली आहे.
वेळ रात्री ११ : ४५ ची
ठिकाण :- कात्रज कोंढवा राजस चौक
मी काल नेहमी प्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्याना खायला घालायला गेलो तर एक pmpml ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडी भोवती फिरत होता ड्रायव्हर त्याच्या ड्रायवर सीट वर बसून होता,
थोडा संशय आला म्हणून कंडक्टर ला विचारले काय प्रकार आहे ?
तेव्हा ते बोले की आम्ही सासवड वरून आलोत गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे त्या इकडेच बाजूला राहतात निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दिर घ्यायला येईल,
पण १५ मिनिटं झाले कोणचं येत नाही आणि फोन लागत नाही...
आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण आता रिक्षा ही मिळत नाही.
त्यांचा दिर नाही आला म्हनून काय झाला मीच त्यांचा दिर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोचवले...
घराच्या दारात पोचवले म्हणून फोटो ही काढला पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टर ला...
त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली...
त्या दोघांची नावे "नागनाथ नवरे" आणि "अरुण दसवडकर"
एक चूक घरच्यांची,
एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजी पणा का केला ?
थोडे तरी शहाणे व्हा...
मनसे नेते वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत असून व्हायरल होत आहे. वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमधून रात्रीचा किस्सा सांगितला आहे. थरारक किस्सा सांगितल्यानंतर वसंत मोरेंनी त्या बसचे कंडक्टर आणि बस चालकाचे कौतुक केलं आहे.