लग्नाची मागणी घालत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लग्नाची मागणी घालत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) -  मुलीची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. हा प्रकार दोन ते चार जून या कालावधीत देहुगाव येथे घडला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहम संजय कोल्हे (रा. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीची इच्छा नसताना तिला 'लग्न कर' असे म्हणून तिचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन मुलीला घराबाहेर येण्यासाठी आरोपीने खुणावले. तसेच तिचा सातत्याने पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.