पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीन ने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
गणेश रामचंद्र नाणेकर (वय 27, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल मंदिर परिसरात सापळा लावला. पोलिसांनी गणेश नाणेकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. ते पिस्टल बाळगण्याबाबत गणेश याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.