राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप  एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांची काल (4 जून) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे. राज्याच्या विकासासाठी आमची युती 11 महिन्यांपासून काम करत आहे. पुढच्या काळात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड कायम  ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार आणि बहुमताने जिंकणार, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.

निवडणुका एकत्रित लढवणार आणि जिंकणार : मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरु असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार."