...तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

...तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

पुणे, (प्रबोधन न्यूज )  -  पुण्यात आज  राष्ट्रवादीची   आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते  अजित पवारांनी  पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं तसेच अंतर्गत वादावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत. कामं केली नाहीत कानखाली देईन किंवा पद काढून घेईल असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले आहे.

आपला जिल्हा 13 तालुक्याचा आहे. प्रत्येक तालुक्यामधून दहा वाहनं वर्धापनदिनासाठी आली पाहिजे. सभा भव्यदिव्य झाली पाहिजे. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत, कामं केली नाहीत तर पद काढून घेऊ, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले.

 काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील सुनील चांदेरे  आणि बाबा कंधारे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एका लग्नात हाणामारी झाली. सुनील चांदेरे हे पुणे जिल्हा बँकेवर संचालक आहेत. तर बाबा कंधारे हे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. या दोघांमधे वाद आहे. या वादातून बाबा कंधारेंनी सुनील चांदेरे यांच्या कानाखाली लगावली होती. आज अजित पवारांनी या दोघांना त्याच भाषेत समज दिली. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर हे दोघेही बैठक संपताच बैठकीच्या ठिकाणावरून गायब झाले. मात्र मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच बोलणं हे वडिलांच्या नात्याने होतं असं म्हणत आम्ही अजित पवारांचे रागावणे मनाला लावून घेत नाही असं म्हटलय.