‘त्या' बनावट यादीत राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या नावामागील गौडबंगाल काय?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘त्या' बनावट यादीत राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या नावामागील गौडबंगाल काय?
‘त्या' बनावट यादीत राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या नावामागील गौडबंगाल काय?

पिंपरी-चिंचवड, दि. १९ एप्रिल - सध्या सोशल मीडियात एक पत्र जोरदार व्हायरल झाले आहे. 'त्या' पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याच्या नावाचा समावेश असल्यामुळे अवघ्या पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष वेधले असून, यामागील राजकीय खेळी नेमकी काय आहे आणि कोणाची आहे, यावर शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, राजभवनाबाहेर राज्यपालांच्या नावाने काही खेळी खेळल्या जात आहेत का? की कोणाला आमदार बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे ? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शिफारस यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रावेत येथील माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाचा समावेश आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या यादीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांची नावे समाविष्ट असल्याने उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनकडून करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस असलेलं ‘ते’ पत्र बनावट आहे. राज्यपालांकडून १२ पैकी ६ आमदारांची नावे दिल्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु तसे काहीही नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

१२ आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या ६ नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर २०२० सालचे असल्याचे या पत्रात लिहिण्यात आले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ नावांची यादी दिली होती. मात्र, अद्याप या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या या बनावट पत्रानुसार राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात काही नावे सूचविण्यात आली आहेत. यामध्ये वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांचा समावेश आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दस्तुरखुद्द राज्यपालांच्या बनावट सही-शिक्क्यासह निवडक नावांचे हे पत्र कोणी व्हायरल केले? यमधील नेमकी खेळी काय? हे अद्याप गुलदस्त्यात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोरेश्वर भोंडवे यांचे नाव यात आल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यपालांच्या नावाने खुलेआम व्हायरल होणाऱ्या या बनावट बनवेगिरीचा मास्टरमाइंड शोधून काढावा अशी मागणी राजकीय क्षेत्रातून होत आहे.