शहरातील मनपा रुग्णालयांत H3N2 आजाराबाबत स्वतंत्र उपचार केंद्र उभारा – नाना काटे

शहरातील मनपा रुग्णालयांत H3N2 आजाराबाबत स्वतंत्र उपचार केंद्र उभारा – नाना काटे

पिंपरी - आपल्या पिंपरी चिंचवड शहरात H3N2 या आजाराने बाधित होवून एका नागरिकाचा यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, ही गंभीर बाब असून याचा गांभीर्याने विचार करावा.

सध्यस्थितीत आपल्या शहरात H3N2 या आजाराशी बाधित एकही ऍक्टीव रुग्ण नाही परंतु महाराष्ट्रातील इतर शहरातील या आजाराबाबत रुग्णाची वाढती संख्या पाहता नागरिकासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मनपा रुग्णालयामध्ये H3N2 या आजाराबाबत योग्य उपचार करण्यासाठी स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्यात यावे.

तसेच या आजारा संबधित लागणारा औषधसाठा योग्य प्रमाणात वरील सर्व रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच या आजाराचा होणारा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्या, असे आवाहन विठ्ठल उर्फ नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर  सिंह यांना केले आहे.