रिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन, निवडणुकीस समोर गेल्यास गाठ आमच्याशी - बाबा कांबळे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन, निवडणुकीस समोर गेल्यास गाठ आमच्याशी - बाबा कांबळे

लोणावळा, दि. २८ एप्रिल - टू व्हीलर बाइक बंद करण्यात यावी, वाढीव दंड कमी करण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या सह रिक्षाचालक मालकांचे विविध प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत, हे प्रश्न प्रलंबित ठेवून प्रस्थापित राजकिय पक्ष निवडणुकीस समोर जात आहेत. महाराष्ट्रात लवकरच 20 महानगरपालिकेत व नगरपालिकेत निवडणुका होणार आहेत, महाराष्ट्रात वीस लाख रिक्षा चालक मालक आहेत. शहरी भागात रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे, यामुळे रिक्षा चालकांचे  प्रश्न प्रलंबित ठेवून निवडणुकीस समोरे गेल्यास  गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा तातडीने रिक्षाचालक मालकांचे प्रश्न सोडवा अन्यथा प्रस्थापित पक्षा विरोधात वेगळा निर्णय घेऊ असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.

लोणावळा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत लोणावळा शहर वतीने रिक्षाचालक मालकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती व पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबूभाई शेख, जितूभाई टेलर, संजय अडसुळ मधुराताई डांगे, अब्बास शेख आदी उपस्थित होते, यावेळी रिक्षाचालक सभासदांना ओळखपत्र व रिक्षाला लावल्यास स्टिकरचे वाटप करण्यात आले,

यावेळी बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांना घरकुल मिळवून दिले, सीएनजी किट अनुदान मिळवून दिले, सीएनजी फिलिंग सेंटर साठी प्रयत्न केले असे असंख्य प्रश्न सोडवले यामुळे महाराष्ट्रात सर्वात मोठी संघटना म्हणून अपल्या संघटनेचा उदय होत आहे, महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात कार्यालय व प्रत्येक जिल्ह्यात संघटनांचे कार्य सुरू आहे लोणावळा शहरात ओला उबेर बंद केले, मिटर कॅलिब्रेशनचे प्रश्न सोडवले, पंचायत वतीने केलेल्या कामामुळे संघटनेवर तुम्ही विश्वास टाकला, मोठया प्रमाणावर सभासद झालात, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही अधिक जोमाने आम्ही काम करू असे बाबा कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते, विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, भाऊ शिवेकर, चंद्रकांत बालगुडे, रवींद्र ताकधुंदे, वसीम खान, संजय डेंगळे, सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद सदावर्ते यांनी केले सूत्रसंचालन बापू तारे यांनी केले आभार बाबू भाई शेख यांनी मानले.